Breaking shocking News _न्यूज...
सोलापूरचे जगप्रसिद्ध न्युरो सर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी... स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या
अनेक रुग्णांचा देवदूत
सोलापूरचे जगप्रसिद्ध न्युरो सर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी... स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची
प्रयत्न प्रथमदर्शनी धक्माकादायक माहिती समोर येत असून
वळसंगकर हॉस्पिटल मध्ये सध्या प्रचंड गर्दी... असून अनेक रुग्णांचा देवदूत देव माणूस हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आकस्मिक मृत्यूने खळबळ
सोलापूर : सोलापुरातील पहिले
मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर (वय ७०, रा. मोदी) यांचा शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता आकस्मिक मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या वार्तेने शहरात खळबळ उडाली. डॉ. वळसंगकरांनी मोदी परिसरातील आपल्या निवासस्थानी बाथरूममध्ये स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपासाअंती सर्व स्पष्ट होईल, असे पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी सांगितले.
डॉ. वळसंगकर यांचे रामवाडी परिसरात मोठे हॉस्पिटल आहे. आपल्या ४० वर्षाच्या वैद्यकीय कारकिर्दीत हजारो
रुग्णांना जीवदान दिले आहे. सामाजिक भान असलेला हा डॉक्टर अचानक गेल्यामुळे शहरातील सर्वच क्षेत्रात शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी असा परिवार आहे. डॉ. वळसंगकर हे रात्री ८ वाजता घरात कुटुंबियांसमवेत जेवण करीत होते. ८.३० वाजता ते अचानक उठले व बाथरूममध्ये गेले. त्यांनी स्वतःच्या बंदुकीने डोक्यात गोळी घातली व ते जमिनीवर पडले. हा प्रकार लक्षात येताच पत्नी व मुलींनी त्यांना त्यांच्या स्वतःच्या वळसंगकर हॉस्पिटल येथे नेल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
डॉ. वळसंगकर यांचे चिरंजीव अश्विन हेही डॉक्टर असून त्यांनी प्राथमिक उपचार केले, पण साडेनऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी होणार आहे.